मुंबई

शिवसेना नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार

CD

शिवसेना नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार

उच्च न्यायालयासह लघुवाद न्यायालयात याचिका दाखल

मुंबई, ता. २४ : विक्रोळीच्या प्रभाग ११९ मधून निवडून आलेले शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार राजेश सोनावळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. सोनावळे यांची उमेदवारी रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयासह लघुवाद न्यायालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, सोनावळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी संदीप खरात यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच सोनावळे यांच्याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (एस विभाग) तक्रार अर्ज केला होता. सोनावळे अध्यक्ष, विश्वस्त असलेली शिवशाही बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था ही पालिकेत कंत्राटदार (वेंडर) आहे. ही संस्था पालिकेच्या घनकचरा विभागाला मनुष्यबळ पुरवते. त्याचा मोबदला या संस्थेस प्राप्त झाला आहे. यातील काही रक्कम सोनावळे यांनी वैयक्तिक खात्यावर वळवली आहे, अशी खरात यांची तक्रार होती. मात्र त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. दरम्यान, महापालिका कायद्यानुसार एखादी व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्य प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पालिकेचा लाभार्थी असल्यास त्याला निवडणूक लढण्याचा अधिकार नाही, या तरतुदीचा आधार घेत दाखल झालेल्या खरात यांच्या याचिकेवर १३ जानेवारीला सुनावणी झाली; मात्र मतदान प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांवर असताना घाईघाईत निवाडा करणे योग्य नाही, असे सांगत न्यायालयाने ही सुनावणी एक महिन्यासाठी तहकूब केली तसेच प्रतिवादींना आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.

...
खोटी माहिती दिल्याचा आरोप
पालिका निवडणुकीत सोनावळे १,१६७ मतांनी विजयी झाले, तर ठाकरे बंधूंच्या आघाडीतर्फे रिंगणात उतरलेले विश्वजित ढोलम ६,९५४ मते घेत दुसऱ्या स्थानी राहिले. ढोलम यांच्यासह निवडणूक लढलेल्या, अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी सोनावळे यांच्याविरोधात लघुवाद न्यायालयात याचिका केल्या आहेत. ढोलम यांनी आपल्या याचिकेत सोनावळे यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याने त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर अन्य याचिकांमध्ये प्रभाग ११९ मधील निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आरोप तथ्यहीन
सोनावळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांचे वकील ॲड. अश्विन भागवत यांनी केलेल्या दाव्यानुसार याचिकेतील आरोप तथ्यहीन आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT