सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध
मुंबई, ता. २४ : अमली पदार्थ तस्कर आणि सराईत गुन्हेगार शमशुद्दीन शेख ऊर्फ अज्जू याचा प्रतिबंधात्मक ताबा घेत एक वर्षासाठी आर्थररोड कारागृहातून अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. शेखविरोधात पाच अमली पदार्थ तस्करी विक्रीसह एकूण १३ गुन्हे नोंद आहेत. यातील काही गुन्हे त्याने कारागृहातून केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सर्वच गुन्ह्यांमधून तो जामिनावर मुक्त झाल्यास पुन्हा अमली पदार्थ तस्करी, विक्री करेल, या शक्यतेवरून त्यास प्रतिबंधात्मक ताबा घेऊन एक वर्षासाठी राज्याच्या अन्य कारागृहात स्थानबद्ध करावे, असा प्रस्ताव गुन्हे शाखेने गृहविभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर केला होता. त्यास मंजुरी मिळताच ही कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.