मुंबई

अंधेरी ‘आराम नगर’चा होणार पुनर्विकास

CD

अंधेरी ‘आराम नगर’चा होणार पुनर्विकास
३६० रहिवाशांना सुसज्ज घरे; म्हाडालाही मिळणार विक्रीयोग्य घरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : अंधेरी पश्चिम येथे निर्वासितांसाठी उभारलेल्या ‘आराम नगर’चा आता म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास होणार आहे. म्हाडाच्या सुमारे ७१ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ३६० सदनिका आहेत. त्या मोडकळीस आल्याने येथील रहिवाशांना पुनर्विकासाची प्रतीक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता बांधकाम आणि विकास संस्थेची (सी अँड डी) नियुक्ती करून सदरचा पुनर्विकास मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना सुसज्ज घरे मिळणार असून, म्हाडालाही विक्रीयोग्य घरे मिळू शकणार आहेत.
अंधेरी पूर्वेकडील आराम नगर येथे स्वातंत्र्यापूर्वी सरकारी जागेवर मिलिटरी बॅरेक उभारण्यात आल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्यानंतर सदरच्या बॅरेक सरकारने निर्वासितांना भाड्याने दिल्या होत्या. येथे अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या एकूण ३६० सदनिका आहेत. सदरच्या सदनिका प्रत्येकी सुमारे ४०-५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आहेत. ७१ हजार ३५० चौरस मीटरचा हा भूखंड असून, तेथे केवळ एक एफएसआय वापरला असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, येथील राहिवाशांना पुनर्विकासाची प्रतीक्षा असून, सी अँड डी संस्थेच्या माध्यमातून सदरचा पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे नियोजन असून, त्याबाबत लवकरच निविदा मागवल्या जाणार आहेत. त्यानुसार जो विकसक राहिवाशांना आणि म्हाडाला जास्तीत जास्त बांधिव क्षेत्रफळ देईल, त्याला काम दिले जाणार आहे.

पुनर्विकासाचा प्रस्ताव
दरम्यान, आराम नगरच्या रहिवाशांनी आपल्या वसाहतीचे पुनर्विकास करण्यासाठी विकसकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्याबाबत म्हाडाकडे प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे म्हाडा आता राहिवाशांच्या प्रस्तावाला मंजुरी देणार की स्वतः सी अँड डी संस्थेची नियुक्ती करून पुनर्विकास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रहिवाशांनी स्वतः विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास केल्यास म्हाडाला प्रीमियम किंवा सदनिका मिळू शकणार आहेत.

- भूखंड : ७१ हजार ३५० चौरस मीटर
- एकूण सदनिका : ३६०
- अल्प उत्पन्न गट : १८८ सदनिका
- मध्यम उत्पन्न गट : १६७ सदनिका
- उच्च उत्पन्न गट : ५ सदनिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT