ब्रेस्ट कॅन्सरवर नियंत्रण
टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी यंत्राचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणी व निदानासाठी अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. या यंत्रामध्ये टॉमोसिंथेसिस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
उद्घाटनासाठी अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे या उपस्थित होत्या. या वेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश, रेडिओडायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी तसेच वरिष्ठ डॉक्टर, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
नव्याने सुरू करण्यात आलेले हे यंत्र रुग्णसेवा आणि व्यापक सार्वजनिक हितासाठी समर्पित असून, सुलभ आणि दर्जेदार कॅन्सर उपचारांचे महत्त्व अधोरेखित करते, असे भिडे यांनी नमूद केले.
देशातील महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेत नियमित तपासणीद्वारे लवकर निदान केल्यास उपचारांचे यश आणि डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले की, या अत्याधुनिक प्रतिमांकन उपकरणामुळे टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व निदान सेवा अधिक सक्षम होतील. कॅन्सर प्रतिबंध, लवकर निदान आणि सर्वसमावेशक रुग्णसेवेसाठी संस्थेची बांधिलकी यामुळे अधिक दृढ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सुयश कुलकर्णी यांनी या प्रणालीच्या तांत्रिक वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना सांगितले की, उच्च रिझोल्यूशन प्रतिमा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने संशयास्पद भाग अधिक अचूकपणे ओळखता येतात. दाट स्तन ऊतकांमध्ये कॅन्सर शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विशेष उपयुक्त असून, अतिरिक्त तपासण्यांची गरज कमी करत जलद निदान आणि वेळेवर उपचार शक्य होते.
याप्रसंगी टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या नेतृत्वाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून महिलांच्या आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचा आणि रुग्णकेंद्रित, उच्च दर्जाची कॅन्सर सेवा देण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.
जलद व अचूक निदान
दीर्घकालीन जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारते, असे डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. नव्या डिजिटल मॅमोग्राफी प्रणालीमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे जलद आणि अधिक अचूक निदान करणे शक्य होणार आहे.
फोटो - 726
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.