मुंबई

मुंबई-ठाण्यात अवकाळी पाऊस

CD

मुंबई-ठाण्यात अवकाळी पाऊस
समुद्रातील बाष्पाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २७ : जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईकर थंडीचा आनंद घेत असतानाच आज सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय हवामान विभागाने काही तासांसाठी या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता.
​​हवामानतज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रात निर्माण झालेली आर्द्रता आणि वाऱ्यांच्या बदललेल्या दिशेमुळे कोकण किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या संमिश्र परिणामामुळे हे स्थानिक पातळीवर पावसाचे ढग तयार झाले आहेत. यामुळेच भर हिवाळ्यात मुंबई आणि ठाण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ​हवामान विभागाने सकाळी ७ वाजता इशारा देत, सकाळी १० वाजेपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार काही भागांत पाऊस पडला. हा पाऊस जरी हलक्या स्वरूपाचा असला, तरी पुढे दुसऱ्या दिवसांपर्यंत आकाश पूर्णपणे ढगाळ राहील आणि काही ठिकाणी दृश्यमानता कमी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
...
थंडीचा जोर ओसरणार?
अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्यांची धांदल उडाली. पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून, दुचाकीस्वारांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढून थंडीचा जोर ओसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT