मालाडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
चिमुरड्यासह सात जण जखमी; चौघे गंभीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मालाड (पश्चिम) येथील मालवणी परिसरात मंगळवारी (ता. २७) सकाळी गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात दोन वर्षांच्या चिमुरड्यासह एकूण सात जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर कूपर आणि आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालवणी गेट क्रमांक आठ भारत माता शाळेजवळील एका तळ अधिक दोन मजली चाळीत सकाळी ९:२५ च्या सुमारास हा अपघात घडला. पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गॅसची गळती होऊन अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेली आग खोलीतील घरगुती सामान, कपडे आणि गाद्यांपर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत सकाळी ९:४२ वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी ६० वर्षीय जुलेखा बानो अन्सारी या ५५-६० टक्के भाजल्या असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच दोन वर्षांचा आदिल शेख हा चिमुरडाही २० टक्के भाजला असून, त्याच्यावरही कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आधार रुग्णालयात दाखल असलेल्या रोमा (वय ३५) आणि अलिशा (१८) या दोघीही ३५ टक्के भाजल्या असून, त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर तीन जखमी विजय चौधरी, तौसिब खान आणि अली कासिम यांना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांनी प्राथमिक उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी घेतली आहे.
...
परिसरात खळबळ
घटनेनंतर पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. गॅसगळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सकाळी कामाच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.