मुंबई

मालाडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट

CD

मालाडमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट
चिमुरड्यासह सात जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २७ : मालाड (पश्चिम) येथील मालवणी परिसरात मंगळवारी (ता. २७) सकाळी गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात दोन वर्षांच्या चिमुरड्यासह एकूण सात जण जखमी झाले. यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. केईएम रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ​कूपर आणि बी.डी.बी.ए. रुग्णालयातून भाजलेल्या सात रुग्णांना पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
​मालवणी गेट क्रमांक आठ भारत माता शाळेजवळील एका तळ अधिक दोन मजली चाळीत सकाळी ९:२५ च्या सुमारास हा अपघात घडला. पहिल्या मजल्यावरील एका खोलीत गॅसची गळती होऊन अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेली आग खोलीतील घरगुती सामान, कपडे आणि गाद्यांपर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करीत सकाळी ९:४२ वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी जुलेखा शेख (वय ४७) ६० टक्के भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. विजय अशोक चौधरी (वय ४८)६० टक्के, तौसिफ खान (२२) ४५ टक्के, अली कासीम (१८) २५ टक्के, रुमा चौधरी (४३) २५ टक्के, अलिशा चौधरी (२०) ३५ टक्के भाजल्या असून आदिल शेख हा दोन वर्षांचा मुलगा १५ टक्के भाजला आहे.
​...
परिसरात खळबळ
घटनेनंतर पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. गॅसगळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सकाळी कामाच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT