मुंबई

लियरजेट ४५ विमान सुरक्षित: विमान वाहतूक तज्ज्ञांचे मत

CD

लियरजेट ४५ विमान सुरक्षित
विमान वाहतूकतज्ज्ञांचे मत 

सकाळ वृत्तसेवा 

मुंबई, ता. २८ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा  बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. याबाबत निष्कर्ष काढणे अद्याप घाईचे आहे.   या अपघातामागे अनेक घटकांचा समावेश असू शकतो आणि सखोल चौकशीनंतरच कारण उघड होईल , असे मत विमान वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) माजी फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक प्रशांत धल्ला म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा  बुधवारी सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. हे विमान मुंबईहून बारामती विमानतळासाठी निघाले होते. हे ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या प्रतिष्ठित कंपनीचे ‘लिअरजेट ४५’ विमान होते आणि यापूर्वीही अनेक लोकांनी या विमानातून प्रवास केला आहे. ‘लिअरजेट ४५’ हे एक सुरक्षित विमान मानले जाते आणि त्याचे वैमानिक खूप अनुभवी होते.
 ==
विमानाची देखभाल खूप चांगल्या पद्धतीने ठेवली जाते. तसेच त्या विमानातील पायलटही  अनुभवी होते, परंतु   विमानाची कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याचा तपास डीजीसीए  करते. घटनास्थळी जाऊन माहिती घेत  अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातो. यामध्ये वातावरण, पायलटला  काही अडथळा आला का, हे पहिले जाते.  विमानात  काही तांत्रिक बिघाड होता का तपासले जाते. गेल्या सहा महिन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला जातो. त्यावरून  निष्कर्ष काढला जातो. डीजीसीएच्या  तपासानंतर अहवालात या बाबी स्पष्ट होतात.  
जितेंद्र भार्गव, विमान वाहतूकतज्ज्ञ 
==
प्राथमिकदृष्ट्या  असे आढळून येते की, जे विमान आहे, ते बंबार्डिअरचे लियरजेट ४५ हे सुरक्षित विमानापैकी एक आहे. जे विशेषतः व्हीआयपींसाठी  वापरले जाते. अजित पवार यांनी या विमानात अनेक वेळा प्रवास केला आहे. बारामती हे त्यांचे क्षेत्र आहे. त्यांनी अनोळख्या ठिकाणी लँडिंग केली नाही. तसेच धुके असल्याने दक्षताबाबत जी एक नियमावली आहे, त्याची पाहणी करून नंतर  विमान लँडिंगचा  प्रयत्न केला. त्यामध्ये अपघात घडून आला, असे दिसते.
विशाल बांगरे, विमान वाहतूकतज्ज्ञ
==
 विमानात  काही बिघाड झाल्याशिवाय विमान रनवेच्या अलीकडे पडणार नाही. वैमानिकाच्या हातात नियंत्रण आहे, जर रनवे दिसला नाही, तर गो राउंड करू शकतो. विमान अपघाताची घटना झाली, त्याचे कारण समजून घ्यावे लागेल. व्हिजिबिलिटीबद्दल बोलणे चुकीचे आहे. गोअराउंड का केला, एकतर  लँडिंग गियर खाली आले नसतील, हायड्रॉलिकचा प्रयत्न केला असेल; पण सिस्टीम जॅम झाली असेल. त्यामध्ये विमान वळत नाही किंवा वरती जात नाही. 
-कॅप्टन अभिजित  अडसूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT