दोन्ही वैमानिकांना प्रदीर्घ अनुभव
सहवैमानिक शांभवी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहपायलट शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे दिल्लीचे आहेत. सुमित कपूर यांना तब्बल १६ हजार तास, तर सहवैमानिक शांभवी पाठक यांच्याकडेही १,५०० तास विमान उड्डाणाचा अनुभव होता.
कपूर यांच्याकडे उड्डाणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये, विशेषतः टेक-ऑफ आणि लँडिंगदरम्यान संपूर्ण फ्लाइट क्रूचे नेतृत्व करण्याची जबाबदारी होती. ते अत्यंत अनुभवी वैमानिक असून सहारा, जेटलाइन आणि जेट एअरवेज या नामांकित विमान कंपन्यांमध्ये त्यांनी सेवा बजावली होती. संबंधित प्रकारच्या विमानाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता.
शांभवी या अत्यंत शांत आणि प्रत्येक बाबतीत काटेकोर होत्या. विमानसेवेबद्दल त्यांना प्रचंड आवड होती आणि त्या आपल्या कामाशी पूर्णतः समर्पित होत्या. शांभवी यांनी २०२० ते २०२२ या कालावधीत मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन, एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात पदवी मिळवली होती. त्यापूर्वी २०१८-१९मध्ये त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकॅडमीतून एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. २०२२ पासून शांभवी या व्हीएसआर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत फर्स्ट ऑफिसर पदावर कार्यरत होत्या. याच कंपनीच्या माध्यमातून त्या वैमानिक म्हणून सेवा देत होत्या. स्पाईसजेटकडून त्यांना एव्हिएशन सिक्युरिटी परवाना देण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२मध्ये जेट ओरिएंटेशन ट्रेनिंग अंतर्गत ए-३२० विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मिळाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.