मुंबई

भांडुप बस अपघातप्रकरणी चालकाला जामीन नाकारला

CD

भांडुप बस अपघातप्रकरणी
चालकाला जामीन नाकारला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भांडुप स्थानक परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघातातील आरोपी आणि बसचालक संतोष सावंत याला जामीन देण्यास सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. २८) नकार दिला. अपघातामागचे मुख्य कारण स्थानक परिसरातील गर्दी होती. त्यामागे कोणताही गुन्हेगारी हेतू नसल्याचा दावा करून सावंतने जामिनाचा अर्ज केला हाेता.

आपण निर्दोष असून आपल्याला खोट्या आरोपांत गोवल्याचे त्याने अर्जात म्हटले हाेते. या अपघातात चार पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर दहा जण जखमी झाले होते. बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाची ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या इलेक्ट्रिक बसने २९ डिसेंबरच्या रात्री भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर पादचाऱ्यांना धडक दिली होती. त्यानंतर निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली बसचा चालक सावंतला भांडुप पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT