मुंबई

आता प्रदूषणाचा अलर्ट तीन दिवस आधीच मिळणार

CD

आता प्रदूषणाचा अलर्ट तीन दिवस आधीच मिळणार
महापालिकेचा ‘प्रोजेक्ट एअरवाइज’ सज्ज; पुण्यातील आयआयएमटीएमच्या मदतीने उभारणार यंत्रणा
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी महापालिकेने आता तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. शहरातील हवेची गुणवत्ता केवळ मोजण्यासाठीच नाही, तर तिचा ७२ तास आधी अंदाज वर्तविण्यासाठी महापालिकेने ‘प्रोजेक्ट एअरवाइज’अंतर्गत मोठी पावले उचलली आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम पुणे) महापालिकेला तांत्रिक बळ देणार आहे.
​​‘प्रोजेक्ट एअरवाइज’चे संपूर्ण तांत्रिक काम आयआयटीएम पुणे या प्रतिष्ठित संस्थेला देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक यंत्रणा आयआयटीएममार्फत उभारली जाणार आहे. या संस्थेतील तज्ज्ञ मुंबईतील वातावरणातील बदल, वाऱ्याचा वेग आणि प्रदूषकांचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास करून ही प्रणाली विकसित करणार आहेत. त्‍यामुळे मुंबईतील सूक्ष्म वातावरणीय बदल टिपणे शक्य होईल.
​​येत्या पुढील चार महिन्यांत म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यासाठी शहरात पाच नवीन अत्याधुनिक हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे उभारण्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
​मुंबईत सध्या असलेली केंद्रे केवळ सद्य:स्थिती सांगतात. मात्र एअरवाइज यंत्रणेमुळे पुढील तीन दिवसांत हवा कशी असेल, याचा अचूक अंदाज आधीच वर्तविला जाईल. ​पीएम २.५, पीएम १० आणि हवेतील नायट्रोजन, सल्फर डायऑक्साइड यांसारख्या घातक वायूंचे अचूक मापन होईल. हा सर्व डेटा रिअल टाइममध्ये महापालिकेच्या मुख्य डॅशबोर्डला जोडला जाईल. ​​हवेची गुणवत्ता ढासळणार असल्यास दमा किंवा श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांना आधीच सतर्क केले जाईल. ज्या भागात प्रदूषणाचा अंदाज असेल तिथे पाणी फवारणाऱ्या गाड्या आधीच तैनात करता येतील. ​प्रदूषण वाढण्याची शक्यता असल्यास संबंधित प्रभागातील बांधकामांच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश पालिका देऊ शकेल.
पर्यावरण विभागाचे उपायुक्‍त अविनाश काटे म्‍हणाले, की प्रोजेक्ट एअरवाइजमुळे मुंबई आता जगातील अशा काही मोजक्या शहरांच्या यादीत येईल, जिथे प्रदूषणाचा अंदाज वर्तविणारी प्रगअत यंत्रणा आहे. केवळ माहिती मिळणार नाही, तर त्यावर प्रत्यक्ष कृती करणे प्रशासनाला सोपे होईल, असा दावा त्‍यांनी केला आहे.

हे आहेत फायदे
* पुढील तीन दिवसांत हवा कशी असेल, याचा अचूक अंदाज आधीच वर्तविला जाईल.
* पीएम २.५, पीएम १० आणि हवेतील नायट्रोजन, सल्फर डायऑक्साइड यांसारख्या घातक वायूंचे अचूक मापन होईल.
* हा सर्व डेटा रिअल टाइममध्ये महापालिकेच्या मुख्य डॅशबोर्डला जोडला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

SCROLL FOR NEXT