मुंबई

आता एसटी चालकांची अचानक मद्य तपासणी

CD

आता एसटीचालकांची अचानक मद्य तपासणी

महामंडळाची कडक पावले

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २९  : परळ बस स्थानकाला परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी  २५ जानेवारीला अचानक भेट दिली. त्या वेळी चालक-वाहक विश्रांतिगृहांत अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. काही कर्मचाऱ्यांनी मद्यपान केल्याचेही उघड झाले. या पार्श्वभूमीवर एसटी मुख्यालयाने अचानक तपासणी (सरप्राइज चेक) करून कठाेर कारवाईचा निर्णय घेतला आहे. तसेच आगारांनाही सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
 
सरनाईक यांनी  राज्यातील सर्व आगारांत कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकांची ब्रेथ ॲनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश  दिले होते. त्यानुसार मद्यपान करणाऱ्या एसटी चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाने दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन ही मोहीम अधिक काटेकोर राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियंता (चालन) विभागामार्फत सर्व विभाग नियंत्रक, विभागीय कार्यशाळा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार कर्तव्यावर जाण्यापूर्वी चालकाने मद्यपान केले नसल्याची खात्री करणे अधिक सक्तीचे करण्यात आले आहे. चालकांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालविणे ही गंभीर बाब असून महामंडळाने शून्य सहनशीलता धोरण अवलंबल्याचे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार असून, एसटी सेवेत शिस्त आणि जबाबदारी अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली जात आहे.
==
तपासणी अधिक कडक
- वाहन देताना होणार ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी. त्यानंतरच वाहन बाहेर जाऊ देणार
- मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित चालकाला तत्काळ कर्तव्यातून दूर ठवून आगार व्यवस्थापकांना माहिती दिली जाणार 
====
आगार व्यवस्थापकावर जबाबदारी
आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच मुख्यालयाकडून अचानक तपासणी (सरप्राइज चेक) करण्यात येणार असल्याने सर्व आगारांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT