आर्थर रोड कारागृहात
कैद्याचा पोलिसावर हल्ला
मुंबई, ता. २९ : न्यायालयीन सुनावणी आटोपून कारागृहात परतलेल्या आरोपीने (न्यायालयीन बंदी) प्रवेशद्वारावर तैनात पोलिसाला मारहाण केली. यात एक पोलिस शिपाई जखमी झाला. ही घटना २७ जानेवारीला संध्याकाळी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घडली. जखमी पोलिस शिपाई हरी वाघ यांच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आरोपी कैदी लोकेंद्र रावतविरोधात २८ जानेवारीला गुन्हा नोंदवला.
२७ जानेवारीला रावत याला न्यायालयात हजर करण्यात येणार हाेते. त्यानुसार सशस्त्र विभागाच्या पथकाने त्याला कारागृहातून न्यायालयात नेले. सुनावणी संपल्यावर कारागृहात आणले. कारागृहात येताच मुख्य प्रवेशद्वाराजवळ अस्वस्थ रावतने बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. सर्वांनी त्याला शांत राहण्याची सूचना केली. त्यानंतर तो आक्रमक झाला आणि त्याने आपले डोके पोलिस शिपाई वाघ यांच्या चेहऱ्यावर आपटले. यात वाघ जखमी झाले. त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर उपस्थित पोलिसांनी रावत यास ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत असावा, या संशयामुळे कारागृह प्रशासनाने त्याची वैद्यकीय तपासणी करून आणा, अशी सूचना सशस्त्र विभागाच्या पथकास केली. पथकाने त्याला जेजे रुग्णालयात नेले. वाघ यांनी दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात रावतविरोधात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.