मुंबई

वाहन चालकांना वेगाचा मोह सुटेना

CD

वाहनचालकांना वेगाचा मोह सुटेना
४० किमीची वेगमर्यादा ६९ टक्के जणांनी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : रस्ते अपघातात हजारो लोकांचा बळी जात असताना वाहनचालक गांभीर्याने घेत नाहीत. रस्ते अपघातास वेग हे प्रमुख कारण आहे; मात्र ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेचेही वाहनचालक पालन करीत नसून ६९ टक्के वाहचालकांनी वेगमर्यादा ओलांडली, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
राज्यातील रस्ते अपघातावर जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या इंटरनॅशनल इंजरी रिसर्च युनिटने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी प्रकल्पांतर्गत आयआयटी बॉम्बेच्या भागीदारीने रस्ते अपघातावर अभ्यास करण्यात आला. मार्च २०२४मध्ये हा अभ्यास ३० ठिकाणी पार पडला, ज्यात एक लाख ३५ हजार ४३५ वाहनांचे निरीक्षण करण्यात आले. निरीक्षणे सकाळी ६:३० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत शनिवार-रविवार आणि सोमवार ते शनिवार या कालावधीत घेण्यात आली. या अभ्यासात एकूण वाहनांपैकी ११ टक्के वाहने हे दिलेल्या वेगमर्यादापेक्षा जास्त वेगाने धावताना आढळली. वाहनप्रकारानुसार दुचाकी वाहनांमध्ये स्पीडिंगची टक्केवारी सर्वाधिक १७ टक्के होती, तर एसयूव्हमध्ये १५ टक्के इतकी. सर्व वाहनांमध्ये एसयूव्हचा सरासरी वेग सर्वाधिक ६८ किलोमीटर प्रतितास नोंदवला गेला. राज्य महामार्गांवर १२ टक्के आणि राष्ट्रीय महामार्गांवर ११ टक्के वेग दिसला, तर एक्स्प्रेसवेवर ही टक्केवारी फक्त सहा टक्के होती.
...
कोठे, किती उल्लंघन?
विशेषतः कमी स्पीड झोनमध्ये स्पीडिंगची प्रमाण जास्त आढळले. ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा असलेल्या भागात ६९ टक्के वाहनांनी ही मर्यादा ओलांडली, तर ८० किलोमीटर प्रतितास झोनमध्ये केवळ चार टक्के वाहनांनीच स्पीड लिमिट ओलांडले. एकूण सरासरी फ्री-फ्लो स्पीड ६४ किलोमीटर प्रतितास होती. त्यात अवजड वाहनांचा सरासरी वेग ६७ किलोमीटर, दुचाकी वाहनांचा ६४ किलोमीटर आणि हलक्या वाहनांचा ६२ किलोमीटर प्रतितास नोंदवला गेला. दिवसानुसार पहिल्यास बुधवारी भरधाव वेगाची टक्केवारी सर्वाधिक २१ टक्के होती, तर आठवड्याच्या शेवटी हे प्रमाण कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Phaltan LPG Gas Shortage: फलटणमध्ये जादा दराने सिलिंडरची विक्री; गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा; ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली

'मला जो सिनेमा मिळायचा तो तिला हवा होता' रंजना देशमुखबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण, म्हणाल्या...'स्पर्धा होती पण...'

Satara Panchayat Election: सातारा जिल्ह्यात आज सभापतींच्‍या निवडी

SCROLL FOR NEXT