मुंबई

मध्य रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

CD

मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद-अर्ध जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहोचतील. दुसरीकडे कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद-अर्ध जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे
कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT