रेल्वे रुळांलगत कचऱ्याला आग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेच्या कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान रुळालगत साचलेल्या कचऱ्याला शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे काही काळासाठी मध्य रेल्वेची मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळित झाली. संध्याकाळच्या वेळेतील गर्दीमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. साडेसहा वाजण्याच्या सुमारास कळवा-ठाणे दरम्यानच्या रेल्वे मार्गालगत कचऱ्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट परिसरात पसरले. धुरामुळे दृश्यमानतेवर परिणाम होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अप आणि डाऊन जलद मार्गांवरील गाड्यांना हँड सिग्नलवर चालविण्याचे आदेश दिले. हा आदेश सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत लागू होता. दरम्यान, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन सुमारे ७ वाजता आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत लोकल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले होते. अनेक लोकल उशिराने धावल्याने स्थानकांवर गर्दी वाढली आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.