जिल्हा परिषद निवडणुकी दिवशी सीटीईटी परीक्षा; शिक्षकांपुढे पेच
मुंबई, ता. ३१ (बातमीदार) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेतली जाणारी सीटीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा ७ फेब्रुवारीला देशभरात आयोजित करण्यात आली आहे. मात्र याच दिवशी राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होणार असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य शिक्षकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
सीबीएसईअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी अनेक शिक्षकांनी गेल्या अनेक वर्षांपासून तयारी केली आहे. मात्र निवडणूक कर्तव्य, दहावीच्या परीक्षा तसेच इतर शैक्षणिक कामकाजामुळे शिक्षक आधीच व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत सीटीईटी परीक्षा आणि जिल्हा परिषद निवडणूक एकाच दिवशी येत असल्याने परीक्षा हुकण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ पुढाकार घेऊन ७ फेब्रुवारीऐवजी सीटीईटी परीक्षा इतर तारखांना घेण्याबाबत सीबीएसईकडे विनंती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने केली आहे.
राज्यात मोठ्या संख्येने शिक्षक सीटीईटी परीक्षेची तयारी करीत असून, अनेक शिक्षकांवर निवडणूक कर्तव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात तातडीने मार्ग काढून शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.