मुंबई

मुंबईत दिवसाला १४ हजार वाहतूक नियमभंग

CD

मुंबईत दिवसाला १४ हजार वाहतूक नियमभंग
वाहतुकीस अडथळा, विनाहेल्मेट, सिग्नल मोडणे, भाडे नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पोलिसांनी अद्ययावत यंत्रणेस कठोर कारवाईची जोड देऊनही शहरातील वाहनचालकांना शिस्त लागली नसल्याचे वाहतूक पोलिसांनी गेल्यावर्षी जारी केलेल्या ई-चलानची आकडेवारी स्पष्ट करते. गेल्यावर्षी प्रत्येक दिवशी सरासरी १४ हजार तर एक मिनिटाला १० वाहतूक नियम मोडले गेले, असेही आकडेवारी स्पष्ट करते.
२०२५मध्ये एकूण वाहतूक पोलिसांनी ५०.९६ लाख ई-चलान जारी करीत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर तब्बल ४९६ कोटींचा दंड आकारला. त्यापैकी १३२ कोटींचा दंड वसूल झाला असून, उर्वरित ३६४ कोटींच्या दंडवसुलीची प्रक्रिया सुरू आहे.
वाहतूक नियमनासाठी रस्त्यांवर प्रत्यक्ष तैनात मनुष्यबळासह शहरात बहुतांश सिग्नल, महत्त्वाचे चौक, उड्डाणपूल, सेतूंवर उभारण्यात आलेले अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे, वेग मापक यंत्रांच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर ई-चलान जारी केले जाते.
सीसीटीव्ही, वेगमापक यंत्रे ताफ्यात दाखल होताच नियमभंग करणारी वाहने सहज आणि मोठ्या संख्येने सापडू लागली. परिणामी ई-चलान जारी होण्याचे प्रमाणही अनेक पटींनी वाढले.
वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल सर्वाधिक दंड आकारला जातो. २०२४मध्ये ५९.३७ लाखांपैकी या नियमभंगासाठी तब्बल २० टक्के चलान जारी झाली होती. त्या खालोखाल विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधात कारवाई झाली होती. त्यासाठी सुमारे १५ टक्के चलान जारी झाली. तर सिग्नल मोडणाऱ्या आणि भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सींवर प्रत्येकी आठ टक्के चलान बजावण्यात आली होती.
२०२४च्या तुलनेत २०२५मध्ये जारी झालेल्या चलनांमध्ये ८.४० लाखांची घसरण झाली असली तरी सिग्नल मोडणे, हेल्मेट न वापरणे, भाडे नाकारणे, वेगमर्यादा धाब्यावर बसवणे ही प्रवृत्ती कायम आहे.

कशाप्रकारे नियम मोडले जातात?
वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नल मोडणे, सीट बेल्ट न लावणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, भाडे नाकारणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अर्थात नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणे किंवा पार्किंगची परवानगी असलेल्या मार्गांवर दुहेरी रांगेत वाहने उभी करणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन किंवा व्यक्तींची वाहतूक इत्यादी शहरातील प्रमुख नियमभंग असल्याचे वाहतूक पोलिस सांगतात.

वर्ष चलान रक्कम
२०२५ ५०.९६ लाख ४९६ कोटी
२०२४ ५९.३१ लाख ४७७ कोटी
२०२३ ५५.३६ लाख ३७८ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT