मुंबई

मुंबईत उन्हाचा चटका वाढला ; किमान तापमानाचा पारा २० अंशांवर, थंडीची लाट ओसरली

CD

मुंबईत उन्हाच्या तीव्रतेत वाढ
किमान तापमानाचा पारा २० अंशांवर, थंडीची लाट ओसरली

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : मुंबईत गेल्या काही दिवसांपासूनचा गारवा आता कमी झाला आहे. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज (ता. १) मुंबईच्या कमाल तापमानाने ३१ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे मुंबईतून थंडी आता हळूहळू निरोप घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या वातावरणात दिसत आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना दुपारी घामाच्या धारा सोसाव्या लागत आहेत. सकाळी वातावरणात किंचित गारवा असला, तरी दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता वाढत आहे. सध्या आकाश पूर्णपणे स्वच्छ असून, कोरड्या हवामानामुळे आर्द्रता कमी झाल्याने उष्णता वाढत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तापमानातील या अचानक होणाऱ्या बदलामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि घसादुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. हवामानातील हा ‘लपंडाव’ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, थंडी आता पूर्णपणे ओसरून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची चिन्हे आहेत. येत्या ४-५ दिवसांत मुंबईतील कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या गतीत बदल झाल्यामुळे वातावरणातील हा बदल घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT