वाढ, आकांक्षा आणि समावेशकतेवर भर
अर्थसंकल्पाबाबत चेंबर ऑफ कॉमर्सची प्रतिक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वाढ, आकांक्षा आणि समावेशकता या तीन मुद्द्यांवर भर दिला आहे. हा अर्थसंकल्प उत्पादकता वाढवून आर्थिक वाढ साध्य करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि सर्वांसाठी संधी उपलब्ध करणे यावर भर देते. शेतकऱ्यांचे उत्पन्न, महिलांचा विकास, युवक, दिव्यांग नागरिक, खासगी उद्योग आणि समान प्रादेशिक विकासावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे मत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून व्यक्त केले आहे.
फार्मा, पर्यटन, एआय, उत्पादन, बँकिंग, पायाभूत सुविधा, शेती, कर, वैश्विक व्यवसाय आणि परदेशी गुंतवणुकीला अर्थसंकल्पात प्रोत्साहन देण्यात आले आहे. ‘भारत व्हिस्टा’ हे बहुभाषिक एआय साधन शेतकऱ्यांना उत्पादकतेसाठी मदत करेल. लखपती दीदी योजना, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, बायोफार्मा शक्तीसाठी १० हजार कोटी, फेमा सुधारणा, अपघात भरपाई करमुक्त, बँकिंग पॅनेल आणि फायनान्स कमिशनला आधार इत्यादींमुळे हा अर्थसंकल्प व्यवसाय, गुंतवणूकदार आणि जागतिक भागीदारांना प्रोत्साहन देणारा आहे, अशी प्रतिक्रिया आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे महासंचालक अजित मंगरूळकर यांनी दिली.
==
हा अर्थसंकल्प एमएसएमई, युवक, महिला, शेतकरी, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, आयुर्वेद यांना मजबूत आधार देतो. भांडवल खर्च वाढवून शाश्वत वाढीचा मार्गदर्शक ठरेल.
- महेंद्र चौहान, उपाध्यक्ष, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.