केंद्रीय अर्थसंकल्प २०२६मध्ये ऑरेंज इकॉनॉमीला, विशेषतः एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्राला भारतासाठी एक महत्त्वपूर्ण रोजगार निर्मिती आणि विकासाचे इंजिन म्हणून स्पष्टपणे ओळख दिली आहे. २०३० पर्यंत एव्हीजीसी उद्योगाला २० लाखांहून अधिक कुशल व्यावसायिकांची गरज भासणार आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण, उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रम तसेच सरकार, शैक्षणिक संस्था आणि स्किलिंग भागीदार यांच्यातील सखोल सहकार्य हे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि भविष्यसिद्ध सर्जनशील कार्यबल उभारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
- संदीप वेलिंग, संचालक, ग्लोबल रिटेल, अपटेक लिमिटेड
अर्थसंकल्पात प्रस्तावित ‘इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड’ हा बांधकाम टप्प्यातील जोखमी कमी करण्यासाठी एक व्यावहारिक पाऊल असून, दीर्घकालीन मोठ्या प्रकल्पांमध्ये खासगी गुंतवणूक वाढवण्यास मदत करेल. याचा व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रालाही सकारात्मक फायदा होईल. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससाठी प्रस्तावित कर सवलत मोठ्या प्रमाणावरील डेटा सेंटर्ससाठी मागणी निर्माण करेल आणि स्थानिक रोजगाराला चालना देईल.
- आशीष रहेजा, व्यवस्थापकीय संचालक, रहेजा युनिव्हर्सल
केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील पुनर्जागरणासाठी एक धोरणात्मक व दूरदृष्टीपूर्ण आराखडा आहे. संरक्षण क्षेत्रासाठी ७.८४ लाख कोटींची भरीव तरतूद, त्यामध्ये २.१९ लाख कोटींपेक्षा अधिक भांडवली खर्चाचा समावेश; संरक्षण आधुनिकीकरण, स्वदेशीकरण आणि क्षमतावृद्धीसाठी सरकारची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते.
- अमित महाजन, संचालक, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज
यंदाचा अर्थसंकल्प सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग परिसंस्थेला भांडवल, तरलता आणि अनुपालन सहाय्याद्वारे संरचनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यावर ठोस भर देतो. १० हजार कोटींचा ‘एसएमई ग्रोथ फंड’ आणि सेल्फ-रिलायंट इंडिया फंडमधील वाढ सूक्ष्म व लघू उद्योगांसाठी जोखीम भांडवलातील दरी भरून काढण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.
- हिरेन शाह, व्यवस्थापकीय संचालक, ज्योती ग्लोबल प्लास्ट
अर्थसंकल्पात वैयक्तिक कररचनेत स्थैर्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मनुष्यबळाच्या दृष्टीने, शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दुवा मजबूत करण्यावर दिलेला भर हा पात्रताकेंद्रिततेकडून कौशल्यकेंद्रित वाढीकडे झालेला बदल दर्शवतो. मॉड्युलर शिक्षण, सतत अपस्किलिंग आणि नोकरीसाठी तयार कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे हे विशेषतः एमएसएमई आणि सेवा क्षेत्रासाठी योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.
- प्रतीक वैद्य, व्यवस्थापकीय संचालक, कर्मा मॅनेजमेंट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.