मुंबई

पश्चिम रेल्वेवर ३२५ नवे एटीव्हीएम

CD

पश्चिम रेल्वेवर ३२५ नवी ‘एटीव्हीएम’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पश्चिम रेल्वे स्थानकांवर ३२५ नवीन एटीव्हीएम (ऑटोमॅटिक टिकटिंग व्हेंडिंग मशीन) बसवण्यात येणार आहेत. या मशीनमधून प्रवासी तिकीट घेणे आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणे लवकर शक्य होईल. ‘मेरा टिकट, मेरी शान, विकसित भारत के लिए मेरा योगदान’ या मोहिमेचे उद्‍घाटन पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप कुमार यांनी चर्चगेट स्थानकावर केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तिकीट खिडकीवरील रांगा कमी करणे आणि प्रवाशांना सहज तिकीट मिळणे. सद्यःस्थितीत पश्चिम रेल्वेत ५०१ एटीव्हीएम कार्यरत आहेत. उपनगरी रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकीसह पादचारी पुलावरही मशीन बसवलेली आहेत. सुमारे ११० जुनी एटीव्हीएम बदलून नवी यंत्रे बसवली जातील, तर उर्वरित मशीन नव्या जागांवर हलवले जातील, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
नवीन ‘एटीव्हीएम’मधून प्रवासी यूपीआय आणि इतर डिजिटल पेमेंटसह तिकीट खरेदी करू शकतील. यामुळे वेळ वाचेल आणि रोख पैशाचा वापर कमी होईल. प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने ‘रेल वन’ मोबाइल अ‍ॅपही सुरू केले आहे, ज्याद्वारे प्रवासी स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करू शकतात. पूर्वी काही एटीव्हीएम अनेक वेळा बंद असत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नवीन मशीनमुळे तिकीट मिळवणे जलद होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

SCROLL FOR NEXT