मुंबई

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना ठार मारण्याचा प्रयत्न!

CD

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना ठार मारण्याचा प्रयत्न!
बिश्नोईचा साथीदार शुभम लोणकर आरोपी

मुंबई, ता. २ ः कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने ठार मारण्याच्या इराद्याने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबार केला, असा निष्कर्ष मुंबई गुन्हे शाखेने प्राथमिक तपासातून काढला आहे. याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात बिश्नोईचा साथीदार शुभम लोणकर आरोपी केल्याची माहिती गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयाला दिली.
शेट्टी यांच्यावरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडून सुरू आहे. पथकाने पुण्यातून स्वप्नील सकट (वय २३, बेरोजगार), समर्थ पोमाजी (१९, विद्यार्थी), सिद्धार्थ येनपुरे (१९, डिलिव्हरी बॉय) आणि आदित्य गायकी (१९, सेल्समन) या चौघांना अटक केली. शेट्टी यांच्या घरावर पाच गोळ्या झाडणाऱ्या तरुणाला शस्त्र, दारूगोळा, दुचाकी आणि अन्य आवश्यक सामग्री पुरवल्याचा आरोप आहे. न्यायालयाने या चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील एका आरोपीवर पुण्यात मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. इतर तिघांना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगण्यात आले.
शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी (शेट्टी टॉवर, नूतन लक्ष्मी सोसायटी) शनिवारी मध्यरात्री १२.४५ वाजता एका तरुणाने पाच गोळ्या झाडल्या. गोळीबार केल्यानंतर हा तरुण होंडा कंपनीच्या दुचाकीवरून पसार झाला. पुढे ही दुचाकी विलेपार्ले येथील सेंट जोसेफ चर्च रोडवर बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळली. दुचाकीसह गोळीबारातील पाच रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या असून त्या बॅलेस्टिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
...
दुचाकीवरून पुणे मॉड्युलचा सुगावा
गुन्ह्यात वापर झालेली दुचाकी पुण्यातील अमन मारोते या तरुणाच्या मालकीची असल्याची माहिती गुन्हे शाखेने मिळवली; मात्र अलीकडेच त्याने आरोपी सकट, पामोजी टोळीला दुचाकी विकल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने ही माहिती पुणे पोलिसांना देत सकट, पामोजीसह चौघांना अटक केली. या चौघांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला दुचाकी, शस्त्रसाठ्यासह सर्वतोपरी सहकार्य केल्याचे चौकशीत उघड झाले. हा शस्त्रसाठा कसा प्राप्त केला, हा गुन्हा कोणाच्या इशाऱ्यावरून करण्यात आला, गोळीबार करण्याआधी शेट्टी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती का, ते बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत का, आरोपी आणि सूत्रधारामधील आर्थिक व्यवहार याबाबत अटकेतील चौघांकडे कसून चौकशी सुरू आहे. तसेच या चौघांच्या मोबाईलची तपासणी सुरू आहे.
...
शूटर परराज्यातील?
शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याला अटक करण्यासाठी पथके प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले; मात्र अन्य कोणतेही तपशील देण्यास नकार दिला. बिश्नोई टोळीने या आधीच्या गुन्ह्यात अवलंबलेली कार्यपद्धती पाहता परराज्यातील साथीदारावर प्रत्यक्ष हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाते. त्याला आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्रातील साथीदार करतात. त्यामुळे शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबार करणारा आरोपीही परराज्यातील असावा, असा अंदाज असल्याचे समजते.
...
पुण्याचे आरोपी लोणकरच्या संपर्कात
पुण्यातून अटक झालेल्या चौघांपैकी दोघे सिग्नल ॲपद्वारे शुभम लोणकरच्या थेट संपर्कात होते, अशी माहिती त्यांच्या मोबाईल फोनच्या तपासणीतून गुन्हे शाखेला मिळाल्याचे समजते.
...
दीड महिन्यांपासून पाळत
गुन्ह्यात वापर झालेली दुचाकी आरोपींनी दीड ते दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आणली होती. आरोपींनी तेव्हापासूनच शेट्टी यांचे निवासस्थान आणि दिवसभराच्या हालचालींवर पाळत ठेवली होती, अशीही माहिती चौकशीतून पुढे आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT