सहकाऱ्याची हत्या करून अपघाताचा आभास
मुंबई, ता. २ ः सहकाऱ्याची हत्या करून अपघाताचा आभास निर्माण करणाऱ्या तरुणास दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रभादेवी येथील कामगारनगर वस्तीत शनिवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही हत्या घडली. अंशू वर्मा असे मृताचे नाव असून तो दादर पश्चिमेकडील एका इंडस्ट्रिअल इस्टेट येथील मारुती पाटील यांच्या चहाच्या टपरीवर काम करत होता. पाटील यांनी वर्मासह टपरीवर काम करणाऱ्या वीरेंद्र पाल यांना कामगारनगर येथील खोली भाड्याने घेऊन दिली होती. या दोघांसह अन्य एक कामगार त्या खोलीत वास्तव्य करीत असे. शनिवारी रात्री दारूच्या नशेत वर्मा घरी आला आणि त्याने वीरेंद्रला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राग अनावर झाल्याने वीरेंद्रने वर्माच्या डोक्यावर अवजड वस्तूचा प्रहार केला. तसेच जीन्सच्या साहाय्याने वर्माचा गळा आवळला. त्यात वर्माचा मृत्यू झाला. भानावर येताच घाबरलेल्या वीरेंद्रने एक मजली घराच्या शिडीवरून धडपडल्याने वर्माचा मृत्यू झाल्याचा आभास उभा केला; मात्र शवविच्छेदन अहवालात वर्माचा मृत्यू गळा आवळल्याने घडल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशीत वीरेंद्रने गुन्हा कबूल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.