भाजपला मनसेचा पाठिंबा नाही : राज
मुंबई, ता. २ : मुंबई महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी मनसेचे नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी महायुतीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळून लावले. मुंबई महापालिकेत भाजपसोबत जाण्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील यासंदर्भात माध्यमांतील बातम्या चुकीच्या असल्याचे नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.