मुंबई

हल्लेखोरास अटक करण्याचे आव्हान

CD

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण
---
हल्लेखोरास अटक करण्याचे आव्हान
चेहरा झाकल्याने ओळख पटविण्यात अडचण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरास अटक करण्याचे मुंबई गुन्हे शाखेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. विलेपार्ले स्थानक परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर कैद झाला; मात्र त्याचा चेहरा झाकला असल्याने त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, त्याच्या शोधार्थ १२ हून अधिक पथके देशभरात रवाना झाल्याचे समजते.
शेट्टी यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून विलेपार्ले येथील सेंट स्टीफन चर्च मार्गावर गेला. तेथे दुचाकी सोडून विलेपार्ले रेल्वे स्थानक परिसरात आला. येथील अनेक सीसीटीव्हींमध्ये त्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत; मात्र चेहरा मुखपट्टीने झाकल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान आहे. दरम्यान, या हल्लेखोराला सहकार्य करणाऱ्या पुण्यातील चार तरुणांना अटक झाली असली, तरी त्यांच्याकडून घटनेबाबत उपयुक्त माहिती गुन्हे शाखेला मिळालेली नाही. हे चारही आरोपी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम लोणकरला ओळखतात. बाबा सिद्दीकी प्रकरणात फरार होईपर्यंत लोणकर पुण्यातच होता. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर लोणकर देशाबाहेर पसार झाला. आता शेट्टी प्रकरणात अटक झालेल्यांपैकी दोन आरोपी सिग्नल ॲपवरून लोणकरच्या संपर्कात होते. सिद्दीकी प्रकरणाप्रमाणे या हल्ल्यासाठीही मनुष्यबळ, आर्थिक रसद, शस्त्रसाठ्याची जुळवाजुळव लोणकरच्याच सूचनेवरून केली गेली, अशी माहिती या आरोपींकडून गुन्हे शाखेला प्राप्त झाली. हल्लेखोराबाबत जुजबी माहितीही पुढे आली; मात्र ती त्याला अटक करण्याइतपत पुरेशी नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
---
शेट्टींचा जबाब नोंदवला
दरम्यान, गुन्हे शाखेने रोहित शेट्टी यांचा जबाब नोंदवल्याचे सांगण्यात आले. लोणकरने फेसबुक पोस्टमध्ये यापूर्वी अनेकदा समज देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून बिश्नोई टोळीने यापूर्वीही धमकी दिली होती का, अशी विचारणा गुन्हे शाखेने शेट्टी यांच्याकडे केल्याचे समजते. या प्रकरणाच्या तपासातील प्रगतीबाबत गुन्हे शाखेने अद्याप अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया माहिती जारी केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT