पोलिस अंमलदार
अपघातात जखमी
मुंबई ः भरधाव मालवाहू टेम्पोच्या धडकेत पोलिस अंमलदार अंकित सुर्वे हे सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलावरून थेट खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या अपघातप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा नोंदवला. सुर्वे हे अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट येथे बंदोबस्तासाठी तैनात होते; मात्र पत्नीची तब्येत बिघडल्याने वरिष्ठांची परवानगी घेऊन ते घरी परतत असताना हा अपघात घडला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.