बोरिवलीत खासगी बस अपघातग्रस्त
मुंबई, ता. ४ : पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवली येथे सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी खासगी बस पदपथावर चढून निवासी संकुलाच्या सीमा भिंतीला धडकून थांबली. हा अपघात बुधवारी (ता. ४) सायंकाळी घडला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात बसचालक किरकोळ जखमी झाला असून अन्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक चौकशीत बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे चालकाने सांगितले. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.