मुंबई

‘टोल वसुलीत तत्परता; संकटात सुस्त का?’

CD

‘टोल वसुलीत तत्परता; संकटात सुस्त का?’
राज ठाकरे यांचा प्रशासनावर प्रहार; टोल परतावा देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ५ : मुंबई आणि पुणे या राज्याच्या दोन प्रमुख शहरांना जोडणारी ‘लाइफलाइन’ समजला जाणारा द्रुतगती मार्ग सलग ३२ तास ठप्प राहिल्याने प्रशासकीय यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. या भीषण परिस्थितीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. ‘रस्ता बांधणे आणि टोल वसूल करणे इतकीच सरकारची जबाबदारी आहे का,’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
​​मुंबई-पुणे ही देशाच्या विकासाची इंजिने असल्याच्या गप्पा मारल्या जातात; मात्र याच मार्गावर ३२ तास वाहतूक ठप्प होते आणि प्रशासन हतबल होऊन बघत राहते, याला राज ठाकरे यांनी ‘कोडगेपणा’ असे संबोधले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून हा मार्ग उभा राहिला. त्याला २४ वर्षे उलटली; मात्र एवढ्या वर्षांत एखादी आपत्ती आल्यास ती निवारण्यासाठी प्रशासनाकडे कोणताही ठोस ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार नसल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे.
​राज ठाकरे यांनी थेट टोल वसुलीवरच बोट ठेवले आहे. ‘‘गेल्या दोन दशकांत रस्त्याचा दर्जा सुधारला नाही किंवा आपत्ती व्यवस्थापन बळकट झाले नाही; मात्र टोल वसुली अत्यंत तत्परतेने केली गेली,’’ असा आरोप त्यांनी केला. मनसेचे टोल आंदोलन हे केवळ टोल देण्याविरोधात नसून, टोलच्या बदल्यात मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सुविधांविरोधात असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडले.
...
‘त्या’ प्रवाशांचा टोल परत करा!
‘‘वाहतूक कोंडीत ३२ तास अडकलेल्या हजारो प्रवाशांचे अन्नपाण्यावाचून हाल झाले. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण या कोंडीत अडकले होते. या प्रवाशांकडून अशा परिस्थितीतही जो टोल वसूल केला गेला, तो सरकारने तत्काळ परत केला पाहिजे,’’ अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
...
‘पालकमंत्री की केवळ पदांचे दावेदार?’
​राज्यातील सत्ताधारी पक्षात सध्या पालकमंत्रिपदावरून मोठे वाद सुरू आहेत. यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, की ‘‘ज्यांना पालकत्वाची इतकी आस आहे, त्यांनी नागरिकांना निराधार का सोडले, सरकारमध्ये पालकमंत्रिपदासाठी भांडणारे नेते जनतेचे पालकत्व कधी स्वीकारणार?’’
...
चौकशांचा फार्स थांबवा!
‘‘दरवेळी चौकशीचे आदेश दिले जातात; पण त्यातून प्रशासन कोणता बोध घेते, असा प्रश्न उपस्थित करीत राज ठाकरे यांनी मागणी केली आहे, की सरकारने केवळ चौकशी न करता भविष्यात अशा घटना रोखण्यासाठीचा कृती आराखडा जाहीर करावा. हायस्पीड ट्रेनच्या घोषणा करण्यापूर्वी सध्याचा मुंबई-पुणे प्रवास सुरक्षित आणि खात्रीशीर करावा,’’ असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT