मुंबई

उपमहापौरपदासाठी शिंदे गटात लॉबिंग

CD

उपमहापौरपदासाठी शिंदे गटात लॉबिंग
तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव यांची नावे चर्चेत
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ५ : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमहापाैरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. उपमहापौरपदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेतून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ‘मातोश्री’ला टक्कर देण्यासाठी महायुती कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी दोन्ही बाजूंकडून वरिष्ठ पातळीवर ‘लॉबिंग’ सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले विक्रमी यश आणि महायुतीचे बहुमत पाहता मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या ऐतिहासिक संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
----
मुंबई साेडण्यास मनाई
केवळ उपमहापौरपदच नव्हे, तर पालिकेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सुधार समितीही शिंदे गटाच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, दगाफटका टाळण्यासाठी ठाकरे गटाने कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट या तिन्ही पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडण्यास मनाई केली आहे. मतदानादिवशी कोणीही अनुपस्थित राहू नये किंवा विरोधी उमेदवाराच्या बाजूने मतदान करू नये, यासाठी व्हीपसह विशेष खबरदारी घेतली जात आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

Latest Marathi News Live Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Mahayuti Leaders Meeting Mumbai : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळवर मुंबईत खलबते; महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलं! सतेज पाटील एकाकी पडणार

Donkey Breeding Scheme: आता गाढव ठरणार ‘सोन्याची खाण’! केंद्र सरकार देणार तब्बल ५० लाखांची मदत; काय आहे योजना?

Stock Market Today: 4 सत्रांच्या घसरणीला ब्रेक! शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT