जर्मनीच्या शिष्टमंडळाची राज्य नावीन्यता सोसायटीला भेट
मुंबई, ता. ५ : जागतिक पातळीवर नावीन्यता परिसंस्था परस्परांशी अधिकाधिक जोडल्या जात असताना, जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीला दिलेली भेट ही महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात नावीन्यता आधारित विकासाच्या क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचे द्योतक ठरली आहे.
जर्मनीतील कार्लस्रुहे हे शहर अग्रगण्य तंत्रज्ञान आणि नावीन्यता केंद्र म्हणून ओळखले जाते. कार्लस्रुहे शहराच्या व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकारातून ही भेट आयोजित करण्यात आली होती. स्टार्टअप्स, प्रगत उत्पादन, कौशल्य विकास आणि धोरण आधारित उद्योजकता या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्याच्या संधींचा शोध घेणे, हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.
या भेटीदरम्यान दोन्ही देशांतील स्टार्टअप परिसंस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. तंत्रज्ञानाधारित उद्योगवाढ, औद्योगिक व उत्पादन क्षेत्रातील नावीन्यता, कौशल्य विकास तसेच उद्योजकतेस चालना देण्यासाठी सार्वजनिक धोरणांची भूमिका या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. याशिवाय शाश्वतता आणि नाविन्यता प्रशासन यावरही चर्चा झाली.
या वेळी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यातील भागीदारी ही केवळ औपचारिक भेटींपुरती न राहता संयुक्त कार्यक्रम, सामायिक नाविन्यता उपक्रम तसेच स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अधिक सक्षम बाजारपेठ प्रवेशाच्या संधी निर्माण करणारी असावी, असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात नाविन्यता क्षमतेचा विकास करण्यासाठी राज्य नावीन्यता सोसायटीकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्य, परिसंस्था उभारणी आणि आंतरराष्ट्रीय संलग्नतेबाबतही त्यांनी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.