‘एकलव्य स्कूल’ प्रवेशासाठी
१ मार्चला पूर्वपरीक्षा
मुंबई, ता. ५ : ठाणे येथील अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयांतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. या स्कूलमधील ५८३ रिक्त जागांसाठी १ मार्चला प्रवेश पूर्वपरीक्षा होणार असल्याचे ठाणे आदिवासी विकास कार्यालयाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सहावीच्या मुलांसाठी १८० व मुलींसाठी १८० जागांवर पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला आहे. इयत्ता सातवी ते नववीच्या २२३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व पूर्वपरीक्षेद्वारे प्रवेश मिळणार आहे.
कांबळगाव ७०, शेंडेगाव ७७, सवणे ८०, पळसुंडे (जव्हार) १२७, हिरवे (मोखाडा) १४७, चळणी (डहाणू) ८२ अशा एकूण ५८३ जागा रिक्त आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.