केबल स्टे ब्रिज अंतिम टप्प्यात
मिसिंग लिंकचे काम मार्चअखेर होणार पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टॅंकर उलटून झालेल्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे याच मार्गाला पर्याय म्हणून उभारला जात असलेला मिसिंग लिंक चर्चेत आला आहे. या मिसिंग लिंकवर असलेल्या खोल दरीवरील केबल स्टे ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल २४० केबलच्या सहाय्याने हा ब्रिज हवेत टांगला जाणार आहे. त्यापैकी २२४ केबल बसवल्या असून, केवळ १६ केबलचे काम बाकी असून, ते मार्चअखेर पूर्ण होणार आहे. त्यानंतर इतर पूरक कामे करून एप्रिल-मेपर्यंत ही मिसिंग लिंक सेवेत दाखल होणार आहे.
मुंबई-पुणे यादरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी करण्याबरोबरच खंडाळा घाटातील वेडीवाकडी वळणे आणि तीव्र चढण बायपास करता यावी म्हणून एमएसआरडीसीकडून सहा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्चून सुमारे १३.५ किलोमीटरचा मिसिंग लिंक उभारला जात आहे. दोन बोगदे आणि खोल दरीवरून हा ब्रिज जात आहे. हा प्रकल्प मार्च २०२५पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण वेगवेगळ्या कारणांनी वेळोवेळी मुदतवाढ द्यावी लागली. हा प्रकल्प वेळेत सेवेत आला असता, तर ३२ तासांहून अधिक काळ झालेली वाहतूक कोंडी सहजपणे टाळता आली असती. त्यामुळेच मिसिंग लिंक चर्चेत आला आहे. दोन बोगदे आणि केबल स्टे ब्रिज असलेल्या या ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. केबल स्टे ब्रिजला एका बाजूला १२०, तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच केबल आहेत. त्यापैकी प्रत्येकी आठ केबलचे काम बाकी असून, ते मार्चअखेर पूर्ण होणार आहे.
...
मेअखेर सेवेत
केबल स्टे ब्रिजचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे फिनिशिंग, लेन मार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे, दिवे, टेलिफोन, रिफ्लेक्टर आदी कामे एप्रिल-मेपर्यंत पूर्ण करून हा प्रकल्प वाहनांसाठी मेअखेर खुला केला जाणार आहे.
...
ना अभ्यास, ना अहवाल!
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. दररोज दीड लाखाहून अधिक वाहनांची ये-जा होते. तसेच सर्वांत कठीण चढण असलेला खंडाळा घाट हा परिसर आहे. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती कशी हाताळावी, जीवघेणी वाहतूक कोंडी कशी फोडावी, पर्यायी व्यवस्था काय, याबाबत ठोस आराखडा नसल्याचे समोर आले आहे. तसेच या बाबीवर अद्याप ना अभ्यास झाला, ना अहवाल तयार झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.