मुंबई

पक्ष बांधणीसाठी मनसे मैदानात

CD

पक्षबांधणीसाठी
मनसे मैदानात
​मुंबई, ता. ५ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे शल्य बाजूला ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या वेळी सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख उपस्थित होते. ठाकरे यांनी या वेळी प्रत्येक विभागाचा वैयक्तिक आढावा घेतला. पक्षवाढीसाठी नेमकी कुठे कसर राहिली, याचे विश्लेषण केले. केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता, जनसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे मैदानात उतरा, असे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
​​मुंबईतील बैठकीनंतर राज ठाकरे टप्प्याटप्प्याने राज्यभरातील इतर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनाही मुंबईत पाचारण करणार आहेत. राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती आणि मनसेची ताकद वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचा आराखडा तयार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Was Dr. Manisha Jejurkar? नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य, डॉक्टर नवरा घरात नसताना...

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

SCROLL FOR NEXT