मुंबई

अवजड वाहनांची तपासणी मोहीम राबवा!

CD

अवजड वाहनांची तपासणी मोहीम राबवा!
आडोशी बोगद्याजवळील अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर परिवहनमंत्र्यांचे आदेश


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांची व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. १०) दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिवहन व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना अपघात रोखायचे असतील, तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे, असे सरनाईक यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे हा मार्ग तब्बल ३२ तास ठप्प होता. प्राथमिक चौकशीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले. यावर भाष्य करताना मंत्री सरनाईक म्हणाले, ‘चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.’ दरम्यान, राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः फॉर्म १३८/अ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.


‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष
महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलिस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे, या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे आदेश परिवहनमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले. ‘अपघाताची वेदना अजून ताजी असताना शासनाने घेतलेली ही भूमिका म्हणजे केवळ प्रशासकीय हालचाल नाही, तर प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले ठोस पाऊल आहे. नियम, नियंत्रण आणि जागरूकता या त्रिसूत्रावरच सुरक्षित प्रवासाचा पाया उभा आहे,’ असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

SCROLL FOR NEXT