मुंबई

टपाल तिकिटांचा काळाबाजार

CD

टपाल तिकिटांचा काळाबाजार
दिल्लीहून आरोपी गजाआड; २७.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई, ता. १० : देशभर पसरलेल्या कोट्यवधींच्या टपाल तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतील दोन प्रमुख आरोपींना मुंबई पोलिसांनी रविवारी (ता. ८) दिल्लीतून अटक केली. मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि वीरेंद्र प्रसाद अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून २७.८४ कोटींची २० ते २०० रुपये मूल्य असलेली बनावट टपाल तिकिटे जप्त करण्यात आली.

टपाल निरीक्षक आशुतोष कुमार यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिलेल्या तक्रारी आधारे बनावट टपाल तिकिटे देशभर मागणीप्रमाणे वितरित करणाऱ्या टोळीविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता, प्राथमिक तपासात राकेश बिंद (४२), शमशुद्दीन गफ्फार अहमद (३५) आणि शाहीद रझा (३५) या तीन आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आली. अटक आरोपींनी मुख्य सूत्रधाराच्या मदतीने कोट्यवधींची बोगस टपाल तिकिटे छापून ती मागणीप्रमाणे देशभर विकल्याचे कबूल केले, विशेष म्हणजे गफार आणि रझा यांच्या बँक खात्यांवर सात ते आठ कोटींचे व्यवहार आढळले होते. या तिघांच्या अटकेनंतर मुख्य आरोपी शेख व प्रसाद फरार होते. अटकेच्या भीतीने ते सतत ठावठिकाणा बदलत होते; मात्र वरिष्ठ निरीक्षक योगेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक निरीक्षक धनेश सातार्डेकर आणि पथकाने या दोघांचा दिल्लीतील नेमका ठावठिकाणा शोधून काढला. या पथकाने तब्बल दोन आठवडे आरोपींवर पाळत ठेवून रविवारी त्यांना अटक केली.


बनावट तिकिटे जप्त
आरोपी शेख, प्रसाद यांच्याकडून पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेली (१० रुपये), मदर तेरेसा यांचे चित्र असलेली (२० रुपये), मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्र असलेली (प्रत्येकी पाच रुपये), अशोक स्तंभाचे चित्र असलेली (१०० व २०० रुपये) आणि रवींद्रनाथ टागोर यांचे चित्र असलेली (५० रुपये) तिकिटे जप्त केली आहेत. त्यांचे मूल्य २७.८४ लाख इतके आहे.

असा उघड झाला काळाबाजार
मुंबईहून पाठवलेल्या पाच पत्रांवरील तिकिटे बनावट आहेत, असा संशय व्यक्त करणारे गोपनीय पत्र भोपाळ पोस्ट कार्यालयाने मुख्य पोस्ट मास्टर जनरलना पाठवले. त्यानंतर या तिकिटांची नाशिक येथील शासकीय छापखान्यात तपासणी करण्यात आली. तेव्हा संबंधित तिकिटे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा तपास सुरू झाला.

असा लागला सुगावा
बनावट तिकिटे लावलेली पत्रे एका वित्तीय कंपनीने पाठवली होती. चौकशीदरम्यान कंपनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार १० आणि १३ जून १३ रोजी सुमारे १२ हजार पत्रे आरोपी बिंदकरवी पाठवली, पोलिसांनी बिंद यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यात त्याने बनावट तिकिटे अहमद, रझा यांच्याकडून अर्ध्या किमतीत विकत घेतल्याचे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT