चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपणार!
मुंबईच्या महापौर, उपमहापौरांची आज घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई महापालिकेतील चार वर्षांची प्रशासकीय राजवट अखेर उद्या (ता. ११) संपुष्टात येणार आहे. उद्या पालिकेत नव्या महापौर आणि उपमहापौरांची घोषणा होणार आहे. महापौरपदासाठी भाजपने रितू तावडे, तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाने संजय घाडी यांचे नाव जाहीर केले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
कोविड महामारीच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांमुळे मार्च २०२२ पासून पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती; मात्र त्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे जवळपास चार वर्षे प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीच्या काळातील महापालिकेच्या कारभारावर विरोधकांनी वेळोवेळी आक्षेप घेतला. प्रामुख्याने प्रशासक आणि राज्य सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करण्यात आले होते. इतिहासात पहिल्यांदाच पालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांसाठी कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयातूनच पालिकेचे कामकाज नियंत्रित केले जात असल्याची टीका झाली. आयुक्त आणि पालकमंत्र्यांनी जवळच्या माजी नगरसेवकांना किंवा विशिष्ट प्रकल्पांना झुकते माप देऊन निधी देत असल्याचा आरोप झाला. महापालिकेच्या मुदत ठेवी मोडून तिजोरी रिकामी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.
---
काँग्रेसचे नगरसेवक हजर राहणार
पालिका सभागृहात उद्या होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नगरसेवक हजर राहणार आहेत. मुंबईकरांना विवाद नको, विकास हवा आहे. म्हणून आमचे नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर सभागृहात आवाज उठवतील. बेस्टसह महापालिकेच्या विविध विभागांत खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. मुंबई विकण्याचे भाजप महायुतीचे मनसुबे आमचे नगरसेवक उधळून लावतील, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.