परळ बस स्थानकातील
घटनेसंदर्भात समिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मुंबई विभागातील परळ बस स्थानकावरील पाहणीदरम्यान उघडकीस आलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. परिवहन विभागाच्या अधिकृत पत्राद्वारे एसटी महामंडळाला महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२४ जानेवारीला परिवहनमंत्री सरनाईक यांनी परळ आगाराला दिलेल्या भेटीत चालक आणि वाहकांच्या विश्रांतिगृहात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. याशिवाय काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची नोंदही निदर्शनास आली. या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूपाचे संबोधून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समिती संबंधित सर्व बाबींची तपशीलवार चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करणार आहे. भविष्यात अशा अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समितीने ठोस सूचना सादर कराव्यात, असे आदेश पत्रात नमूद आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईबाबत शासनाला तत्काळ कळविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.