मुंबई

कुर्ला - ट्रॉम्बे मार्गावरील झोपड्यांच्या तोडकामाला स्थगिती

CD

कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावरील झोपड्यांच्या तोडकामाला स्थगिती
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानंतर मध्य रेल्वेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : उपनगरी रेल्वेतील पायाभूत सुविधा विस्तारासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याची भूमिका सातत्याने मांडणाऱ्या मध्य रेल्वेला कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत माघार घ्यावी लागली आहे. या मार्गालगत असलेल्या हजारो झोपड्यांवरील प्रस्तावित तोडकाम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे; रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
मुंबई उपनगरी रेल्वेवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असले तरी जागेअभावी त्यांची अंमलबजावणी रखडलेली आहे; परिणामी प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यू व जखमींच्या घटना सातत्याने घडत आहेत. फेऱ्या वाढवणे व दीर्घ लोकल चालवण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर याचा थेट परिणाम होत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेकडून कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर १५ डब्यांच्या लोकलसाठी स्टेबलिंग लाइन उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते, त्यासाठी सुमारे नऊ हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता निश्चित करण्यात आली. या परिसरातील एकूण ३,७६२ अतिक्रमित झोपड्यांची नोंद करण्यात आली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३४६ झोपड्यांना न्यायालयीन स्थगिती मिळाली होती, तर उर्वरित ३,४१६ झोपड्यांवर कारवाई प्रस्तावित होती. प्रारंभी १० फेब्रुवारी रोजी तोडकामाचे नियोजन करण्यात आले होते. नंतर सुधारित वेळापत्रकानुसार १६ फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली; मात्र यादरम्यान रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावरून हस्तक्षेप झाल्यानंतर संपूर्ण कारवाई अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली.


..
लोकप्रतिनिधींची रेल्वेमंत्र्यांकडे धाव
कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावरील झोपड्यांवरील कारवाई रोखण्यासाठी विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत निवेदन सादर केले. माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काटे, खासदार वर्षा गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुदस्सर पटेल यांनी संयुक्तरीत्या पाठपुरावा केला. संबंधित वस्त्यांमध्ये २० वर्षांहून अधिक काळापासून नागरिक वास्तव्यास असून, हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पुनर्वसनाचा ठोस आराखडा तयार केल्यानंतरच पुढील कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT