कोस्टल रोडवर ‘जय हो’ची धून
देशातील पहिल्या म्युझिकल रोडचे आज लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईतील कोस्टल रोडवर प्रवाशांना आता अनोखा सांगीतिक अनुभव मिळणार आहे. या मार्गावर भारतातील पहिल्या ‘म्युझिकल रोड’ संकल्पनेचे लोकार्पण उद्या (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानाचे ‘म्युझिकल पट्टे’ बसवण्यात आले आहेत. नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर हे पट्टे आहेत. एखादे वाहन ताशी ७० ते ८० किमी/तास वेगाने या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू येईल. कोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेवर (वरळीच्या दिशेने) ५०० मीटर लांबीच्या पट्ट्यात ही सुविधा उपलब्ध केली आहे. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठरावीक अंतरावर विशिष्ट खोबणी तयार केल्या आहेत. वाहनाचा वेग ठरावीक असल्यास ध्वनीलहरींच्या माध्यमातून ‘जय हो’चे संगीत ऐकू येईल. चालकांना सतर्क करण्यासाठी ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतरावर विशेष सूचनाफलक लावण्यात आले आहेत.
---
भारत पाचवा देश
जपान, हंगेरी, दक्षिण कोरिया आणि यूएई यांच्यानंतर असा प्रयोग करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. २००७मध्ये जपानमध्ये शोध लागलेली ही ‘मेलडी रोड’ संकल्पना आता मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार आहे. हा केवळ रस्ता नसून आधुनिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक अभिमान यांचा संगम आहे. मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये या म्युझिकल रोडमुळे जागतिक दर्जाची भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.