मुंबई

कौशल्य, प्रशिक्षण व थेट नोकरीची संधी

CD

कौशल्य, प्रशिक्षण व थेट नोकरीची संधी
मुंबई विद्यापीठाचे उद्योग संस्थांशी करार; विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष कामाचा अनुभव

मुंबई, ता. ११ : मुंबई विद्यापीठाने अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) म्हणजेच प्रशिक्षण संलग्न पदवी कार्यक्रमाअंतर्गत ३१ अग्रगण्य उद्योग संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराद्वारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये संरचित अप्रेंटिसशिप, प्रत्यक्ष कार्यस्थळीच प्रशिक्षण, औद्योगिक प्रकल्पांमध्ये सहभाग, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि कौशल्याधारित व्यावसायिक प्रशिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वाढीसोबतच उद्योगसिद्ध कौशल्य विकास, नवोपक्रम आणि अनुप्रयुक्त संशोधनाला चालना देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

उद्योग आणि विद्यापीठ यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण देणे, ही काळाची गरज आहे. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम हा उच्च शिक्षणातील परिवर्तनाचा नवा अध्याय असून, या धोरणात्मक भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर जागतिक स्पर्धेला तोंड देण्यास सक्षम कौशल्ये प्राप्त होऊ शकतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट करून विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रा. केयुर कुमार नायक यांनी सांगितले. तसेच या उपक्रमामुळे विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, करिअर संधी आणि कार्यबल सज्जतेत लक्षणीय वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

-------------
चौकट
पेंट आणि कोटिंग (रंग व लेपन) तंत्रज्ञान क्षेत्रातील कान्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड, निप्पॉन पेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, ईस्टमन केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व्हॉक्सको पिग्मेंट्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, के-टेक (इंडिया) लिमिटेड, अ‍ॅक्वाप्रूफ कन्स्ट्रक्शन केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेनिको केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राज स्पेशालिटी एडिटिव्हज प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तसेच लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील एसएपी ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सह इतर क्षेत्रांतील विविध उद्योगसंस्थांशीही करार करण्यात आले. हे सर्व करार मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेत कार्यान्वित केले जाणार आहेत. आजमितीस या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध कौशल्याधारीत अभ्यासक्रम राबविले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT