चार कामगार संहितांविरोधात
कामगार भवन येथे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : कामगारांना जाचक ठरणाऱ्या चार कामगार संहिता मागे घ्या, या मागणीसाठी आज देशव्यापी संपात बीकेसी, वांद्रे-कामगार भवन येथील आयुक्तांच्या कार्यालयावर कामगारांनी आंदोलन केले. केंद्र सरकारच्या कामगारहित विरोधी धोरणांना कडाडून विरोध करण्यासाठी गुरुवारी सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली होती. या देशव्यापी संपाला देशातील शेतकरीवर्गाने पाठिंबा देऊन कामगार हिताविरोधातील केंद्र सरकारचा निषेध केला.
वांद्रे सीबीडी येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयावर कामगार संघटनांच्या आंदोलनात मुंबईत कर्मचारी संघटना संयुक्त संघटनेच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या महाराष्ट्र इंटक, आयटक, एचएमएस, सीआयटीयू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीटीयू, टीयूसीआय, बीयूसी टीयू, शिक्षक संघटना, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ आणि स्वतंत्र फेडरेशन यात सहभागी झाले होते . आंदोलनात बंद गिरण्या-कारखाने, बँक कर्मचारी, अंगणवाडी, घरेलू कामगार असे विविध असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने कामगारविरोधी चार श्रम संहिता अमलात आणून भारतीय कामगारवर्गाच्या हक्कावर मोठा आघात केला आहे. नगर संघटनेने लढ्यात मिळवलेले २९ कामगार कायदे रद्द करण्यात येऊन या चार श्रम संहिता सरकारने लागू केल्या आहेत. कामगार संघटनांना कमजोर करणे आणि उद्ध्वस्त करणे हाच एकमेव उद्देश यामागे सरकारचा आहे, असा आराेप कामगार संघटनांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.