मुंबई

थकीत करासाठी मालमत्तांचे ई-लिलाव

CD

थकीत करासाठी मालमत्तांचे ई-लिलाव
महापालिकेचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महापालिकेने कठोर पावले उचलली असून जप्ती व लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. ४५५ कोटी ४८ लाख रुपयांचा थकीत कर वसूल करण्यासाठी महापालिकेने गुरुवारी (ता. १२) आठ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई केली. यापैकी सहा मालमत्तांची ई-लिलाव प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू करण्यात आली असून, दोन मालमत्ताधारकांना २१ दिवसांची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.
​महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने आज ई, डी, एफ-दक्षिण, एच-पश्चिम, पी-उत्तर, पी-दक्षिण आणि आर-उत्तर या विभागांमधील थकबाकीदारांवर ही धडक कारवाई केली. यामध्ये हॉटेल, मोकळे भूखंड, औद्योगिक गाळे आणि व्यावसायिक कार्यालयांचा समावेश आहे. संबंधित मालमत्ताधारकांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर पालिका प्रशासनाने लिलावाचे पाऊल उचलले आहे. लिलाव प्रक्रियेत गोरेगाव पश्चिम येथील मेसर्स आमिर पार्क ॲण्ड ॲम्युझमेंटचे हॉटेल (२६८ कोटी १६ लाख), वांद्रे पश्चिम येथील दुकाने व कार्यालये (५१.४२ कोटी), दहिसर येथील निवासी भूखंड (३४.८१ कोटी), परळ येथील मोकळा भूखंड (३४.१४ कोटी), माझगाव येथील तेल गिरणी व गोदाम (२३.२० कोटी) आणि मालाड येथील व्यावसायिक शेड (९.२३ कोटी) यांचा समावेश आहे. फोर्ट परिसरातील सरदार सय्यदना ताहेर सैफुद्दीन साहेब यांच्या मालकीच्या दोन मालमत्तांना (रुग्णालय व व्यावसायिक गाळे) २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सुमारे ३४ कोटी ५१ लाखांची थकबाकी न भरल्यास या मालमत्तांचाही लिलाव केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
​...
कारवाई सुरूच राहणार!
महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी सहा हजार २०० कोटी रुपयांचे कर संकलन उद्दिष्ट ठेवले आहे. १ एप्रिल २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पाच हजार ४२६ कोटी ८१ लाख रुपयांची वसुली झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चअखेरपर्यंत ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.​ ‘आर्थिक क्षमता असूनही जाणीवपूर्वक करभरणा टाळणाऱ्यांविरुद्ध मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २०३ ते २०६नुसार जप्ती व लिलावाची कठोर कारवाई सुरूच राहील,’ असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

SCROLL FOR NEXT