मुंबई

नितंब सांधा प्रत्यारोपणात ‘डायरेक्ट एंटीरियर’ तंत्र

CD

नवे तंत्र, सुरक्षित शस्त्रक्रिया
‘डायरेक्ट एंटीरियर’ पद्धतीमुळे कमी धोका

मुंबई, ता. २४ : नितंब सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत ‘डायरेक्ट एंटीरियर अप्रोच’ या आधुनिक तंत्रामुळे जटिल रुग्णही लवकर बरे होत असल्याचे समोर आले आहे. कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालय येथे या पद्धतीने करण्यात आलेल्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, एका दिव्यांग युवकासह एका शेतकऱ्याला पुन्हा स्वावलंबी जीवन जगता येऊ लागले आहे.
या तंत्रात नितंब सांध्याच्या पुढील बाजूने लहान छिद्राद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे स्नायूंना कमी इजा होते, रक्तस्राव अत्यल्प राहतो आणि रुग्ण लवकर चालू लागतो. देशात अद्याप अत्यल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. पहिल्या प्रकरणात ३२ वर्षीय युवकाच्या मांडीच्या हाडाच्या वरच्या भागाला (फीमर नेक) फ्रॅक्चर झाले होते. काही कारणांमुळे त्याला शस्त्रक्रिया नाकारण्यात आली होती आणि आयुष्यभर काठीच्या आधाराने चालण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. संदीप वासनिक यांनी तपासणीनंतर ‘डायरेक्ट एंटीरियर’ तंत्राने टोटल हिप रिप्लेसमेंट केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, रक्तस्राव अत्यल्प झाला आणि रुग्णाला अवघ्या ३६ तासांत घरी सोडण्यात आले.
दुसऱ्या प्रकरणात ५० वर्षीय शेतकरी गेली आठ वर्षे दोन्ही नितंब सांध्याच्या वेदना आणि लंगडत चालण्याच्या त्रासाने त्रस्त होते. त्यांच्यावरही याच पद्धतीने दोन्ही नितंबांचे टोटल हिप रिप्लेसमेंट करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच त्यांना चालविण्यात आले आणि २४ तासांत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या ते पुन्हा शेतीचे काम करू लागले आहेत. या तंत्रामुळे नितंब सांधा निखळण्याचा धोका कमी होऊन रुग्णांचे पुनर्वसन जलद होते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT