मुंबई

होळीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा

CD

होळीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा
बागेत होळी पेटवणाऱ्या सोसायट्यांवर निर्बंध आणण्याची पर्यावरणप्रेमींची आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होळी साजरी करताना झाडांचे आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तत्काळ मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जाहीर करावीत, अशी आग्रही मागणी पर्यावरणप्रेमी आणि प्राणी कल्याण अधिकारी डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईतील ढासळणारा हवेचा दर्जा आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, यंदाची होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी होणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये बागेत किंवा मोठ्या झाडांच्या अगदी खाली होळी पेटवली जाते. त्यामुळे झाडांच्या फांद्या व पाने करपून झाडांचे मोठे नुकसान होते. मालाड (पश्चिम) येथील विकास पार्क सोसायटीचे उदाहरण देत डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, बागेत होळी पेटवल्यामुळे आम्हाला आमचे एक निंबाचे झाड गमवावे लागले. झाडे ही केवळ लाकूड नसून ती पक्षी, खारी आणि इतर लहान जीवांचे निवासस्थान असते. होळीच्या आगीमुळे त्यांच्या अधिवासाचा नाश होतो.
डॉ. कुलकर्णी यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार, होळी ही बागेपासून व झाडांपासून सुरक्षित अंतरावरच पेटवावी.
संबंधित विभागातील वृक्ष अधिकाऱ्यांनी सोसायट्यांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिबंधात्मक सूचना द्याव्यात. हवेच्या गुणवत्तेबाबत गेल्या वर्षी लागू केलेले कडक नियम होळीसाठीही लागू करावेत. ज्या सोसायट्यांकडे बागेव्यतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणीच होळी पेटवण्याचे बंधनकारक करावे.
मी दरवर्षी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करते. तक्रारीची दखल घेतली जाते; मात्र ठोस कृती होताना दिसत नाही. त्यामुळे काही सोसायट्या दरवर्षी बागेतच होळी पेटवण्याचा अट्टहास धरतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. नंदिनी कुलकर्णी या कॅन्सरतज्ज्ञ असून पर्यावरण आणि प्राणीकल्याण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन यंदा कोणती नवी नियमावली जाहीर करते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT