मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून

CD

वाढीव वेतनाची फाइल पडून
एसटी महामंडळाचा निधीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १९ : एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाइल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून आहे. एसटी महामंडळाचा निधीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार करूनही अर्थ खात्यातील अधिकारी या फाइलकडे लक्ष  देत नाहीत, असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.
 एसटी महामंडळातील ८६,००० कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनवाढ फरक रक्कम हप्ता मिळाला नसल्याने त्यासाठी एसटीने राज्य सरकारकडे १९२. ४६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला सरकारकडून येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रकमेसह एकूण ७२५.४६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असताना फक्त ४०० कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडून देण्यात आल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. या महिन्यात वेतनवाढ फरकाची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही.   
या संदर्भातील आंदोलन नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आली आहे. २४ फेब्रुवारीला आझाद मैदान, मुंबई येथे हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे १६ वेळा पत्रव्यवहार केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हेसुद्धा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जातीने लक्ष देत आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या परिवहन विभागानेसुद्धा अनेकवेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा अर्थ खात्यातील अधिकारी या फाइलकडे लक्ष द्यायला तयार नसून ते झोपेचे सोंग घेऊन सुस्त झाले आहेत. अर्थखात्याचा प्रभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालून झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.  
====
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नाही. निधीच्या मागणीची फाइल अर्थखात्यात निर्णयाविना पडून आहे. हप्ता न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत ‘बोंब मारो’ आंदोलन करणार आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस,  महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT