मुंबई

राष्ट्रीय सार्वभौमत्वाची व्याख्या एआय नव्याने करेल ः जीत अदाणी

CD

राष्ट्रीय सार्वभौमत्वाची व्याख्या एआय नव्याने करेल ः जीत अदाणी

नवी दिल्ली, ता. १९ (पीटीआय) : भारताने आयातीवर अवलंबून न राहता स्वतःची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पायाभूत संरचना विकसित करावी. कारण राष्ट्रीय सार्वभौमत्वाची नव्याने व्याख्या एआय करणार आहे, असे अदाणी समूहाचे कार्यकारी संचालक जीत गौतम अदाणी यांनी आज येथे सांगितले.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये ‘इंटेलिजन्स सेंच्युरी’मध्ये जीत अदाणी यांनी ऊर्जा, संगणन व क्लाऊड आणि सेवा हे सार्वभौमत्वाचे तीन मुख्य स्तंभ असल्याचे नमूद केले. क्लाऊड सार्वभौमत्वाबाबत ते म्हणाले, भारताने ऊर्जा, संगणन व क्लाऊड आणि सेवांमध्ये सार्वभौमत्व सुनिश्चित केले पाहिजे, जेणेकरून देशाचे एआय भविष्य सुरक्षित राहील. क्लाऊड सार्वभौमत्व म्हणजे अलिप्तता नव्हे; तर स्वायत्तता होय. भारताने महत्त्वपूर्ण एआय कामे देशांतर्गतच केली पाहिजेत आणि स्टार्टअप्स, शिक्षणसंस्था, संरक्षण, आरोग्य व उत्पादन क्षेत्राला उच्च-कार्यक्षम संगणन सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. एआयचा लाभ प्रथम भारतीय नागरिकांना शेती, शिक्षण, आरोग्य, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि आर्थिक समावेशन या क्षेत्रांत मिळाला पाहिजे.
अदाणी समूहाने हरित ऊर्जेवर आधारित सार्वभौम एआय प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी १०० अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली असून, त्यातून पाच गिगावॉट क्षमतेची आणि २५० अब्ज डॉलर्स मूल्याची एकात्मिक ऊर्जा आणि संगणन परियंत्रणा उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले.
...
जीत अदाणी म्हणाले...
१. ऊर्जा सुरक्षेशिवाय एआय कार्यक्षमता शक्य नाही. त्यामुळे सौर, पवन आणि संचयन यांसारख्या अक्षय ऊर्जा विस्ताराला केवळ हवामान धोरण नव्हे; तर धोरणात्मक पायाभूत संरचना मानले पाहिजे. पूर्वी राष्ट्रांनी व्यापारमार्ग सुरक्षित करण्यासाठी नौदल उभारले. आज आपण बुद्धिमत्तामार्ग सुरक्षित करण्यासाठी सार्वभौम संगणन उभारत आहोत.
२. भारताची आयटी क्रांती देशाला जागतिक डिजिटल सेवा केंद्र बनवून गेली; मात्र उत्पादकतेचा मोठा लाभ इतरत्र गेला. एआय क्रांतीत भारताला ही स्थिती बदलण्याची ऐतिहासिक संधी आहे. नूतनीकरणीय ऊर्जा, ग्रीड सक्षमता आणि हायपरस्केल संगणन यांचे एकत्रीकरण करून भारताचे एआय भविष्य सुरक्षित, सार्वभौम आणि राष्ट्रीय स्तरावर मजबूत करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT