मुंबई

सकाळ इम्पॅक्ट न्यूज : मध्य रेल्वेकडून राज्याच्या मुख्य सचिवांना थेट पत्र

CD

सकाळ इम्पॅक्ट न्यूज

मध्य रेल्वेकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
- दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे-राज्य सरकार आमनेसामने
- उड्डाणपूल तातडीने पूर्ण करा; तरच वक्तशीरपणात तीन-चार टक्के वाढणार

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : सात वर्षांपासून अर्धवट पडून असलेल्या दिवा उड्डाणपूलप्रकरणी अखेर संघर्ष उघडपणे समोर आला आहे. ‘सकाळ’च्या ‘ऑपरेशन दिवा’ मालिकेनंतर मध्य रेल्वेने थेट राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत उड्डाणपूल तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. दररोज ३९ वेळा बंद होणाऱ्या फाटकामुळे लोकल सेवेला गंभीर फटका बसत असल्याचे रेल्वेने स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे.

दिवा जंक्शनवरील फाटकामुळे दररोज तब्बल ६० ते ७० लोकल गाड्यांवर परिणाम होत आहे. प्रत्येक वेळी फाटक बंद झाले की गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. सिग्नलिंगची साखळी विस्कळित होते. संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वेळ भरून काढण्यासाठी रेल्वेला अक्षरशः कसरत करावी लागते. रेल्वेच्या अंतर्गत अंदाजानुसार, हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास वक्तशीरपणात किमान तीन ते चार टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच आज जो विलंब रोजचा नियम बनला आहे, तो मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो. हजारो प्रवाशांचा वेळ वाचू शकतो.

फाटकाचा दररोजचा अडथळा
सध्या फाटक बंद झाले की वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पसरतात. रुग्णवाहिका अडकतात. कामगार उशिरा पोहोचतात. रेल्वेगाड्या थांबतात किंवा रेंगाळतात. हा प्रश्न केवळ स्थानिकांचा राहिलेला नाही; तो संपूर्ण उपनगरीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर घाला घालतो आहे. उड्डाणपूल पूर्ण होणे ही आता केवळ मागणी नाही, तर तातडीची गरज आहे.

दररोज फाटक ३९ वेळा बंद
दिवा स्थानक हे उपनगरीय जाळ्यातील अत्यंत गर्दीचे केंद्र मानले जाते. येथे दररोज सुमारे ८९४ लोकल गाड्या धावतात. त्यापैकी ७० ते ७५ टक्के गाड्या येथे थांबतात. स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून सरासरी ३९ वेळा बंद होते. प्रत्येक वेळी वाहतूक ठप्प होते आणि रेल्वेचे वेळापत्रक ढासळते. राज्य सरकार या पत्राची किती दखल घेते आणि प्रत्यक्ष कामाला किती वेग देते, यावरच दिवा परिसरातील लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास अवलंबून आहे.

पुलाचे काम कोणामुळे थांबले?
दिवा स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक अत्यंत महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून दररोज लाखो प्रवासी कळवा, मुंब्रा, शिळफाट्याकडे प्रवास करतात. २०१७ मध्ये या ठिकाणी पूर्व-पश्चिम जोडणारा रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्याचे काम मोठा गाजावाजा करत सुरू झाले. प्रारंभी जलदगतीने सुरू झालेले हे काम काही महिन्यांतच थांबले आणि त्यानंतर सात वर्षांचा काळ उलटून गेला तरी पूल आजही अर्धवट अवस्थेत उभा आहे. पूर्वेकडील बाजूस काही खांब उभे राहिले; पण पश्चिमेकडील बाजूला अजूनही भूसंपादन न झाल्यामुळे काम सुरूच होऊ शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT