मुंबई

राजेश नार्वेकर यांनी स्वीकारला परिवहन आयुक्तपदाचा पदभार

CD

राजेश नार्वेकर यांनी परिवहन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः परिवहन आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी परिवहन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्यामुळे ते पद रिक्त होते. नार्वेकर यांची आज परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. नार्वेकर हे सध्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते.
राजेश नार्वेकर हे २००९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. प्रशासनातील विविध स्तरांवर काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. १९९४ मध्ये महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतून उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. नार्वेकर यांनी यापूर्वी म्हाडा, नोंदणी व मुद्रांक विभाग, तसेच एमआयडीसीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.
२०१८ ते २०२२ या काळात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कामकाज पाहिले. ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद भूषवले. २०१६ ते २०१७ या काळात त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. राजेश नार्वेकर यांच्या कामाची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT