नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या
मुंबई, ता. २० ः नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) आझाद मैदानात आंदोलन होणार आहे. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. कृती समितीचे निमंत्रक दशरथ पाटील यांनी आज (ता. २०) मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.